हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला पॉवरलिफ्टिंगमध्ये चॅम्पियनशिप - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला पॉवरलिफ्टिंगमध्ये चॅम्पियनशिप


हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील खेळाडूंनी देवचंद कॉलेज अर्जुननगर (निपाणी) येथे नुकताच संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एकुण सात पदके मिळवून चॅम्पियनशिप मिळवली. महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वप्नील परशराम पाटील याने कास्य पदक, कु. संजिवनी महादेव कांबळे हिने सुवर्ण पदक, कु. सोनाली सुभाष पाटील हिने रौप्य पदक, कु. स्नेहल शशिकांत बेनके हिने रौप्यपदक, कु. ऋतुजा मारुती पेडणेकर हिने रौप्यपदक, कु. नम्रता ज्ञानेश्वर पाटील हिने कास्य पदक, कु. करूना शिवाजी होणगेकर हिने कास्य पदक मिळवून महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे जेष्ठ संचालक गोपाळराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, जिमखाना प्रमुख प्रा. मनोहर तायडे, प्रा. व्ही. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.