तालुक्यात 8 डिसेंबरपासून सीएम चषक स्पर्धांचे आयोजन, हलकर्णी येथील युवा मोर्चाच्या बैठकीत निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2018

तालुक्यात 8 डिसेंबरपासून सीएम चषक स्पर्धांचे आयोजन, हलकर्णी येथील युवा मोर्चाच्या बैठकीत निर्णय

हलकर्णी (ता. चंदगड) येथील सीएम चषक स्पर्धेचे नियोजनाबाबत चर्चा करताना युवा मोर्चाचे कार्यकर्ते. 

चंदगड / प्रतिनिधी
सीएम चषक स्पर्धा संपुर्ण तालुक्यात घेण्याबाबत आज हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिर येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये सीएम चषक स्पर्धा 8 ते 20 डिसेंबर पर्यंत या कालावधीत घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा तालुकाध्यक्ष भावकु गुरव अध्यक्षस्थानी होते. याचबरोबर स्पर्धेंची ठिकाणे व बक्षीसे याबाबत चर्चा करुन तालुक्यात ठिकठिकाणी डीजीटल फलक लावण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. याबाबत कोणत्या ठिकाणी कोणत्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. याबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. संदिप नांदवडेकर, आर. के. पाटील,  राजीव पाटील,  सुरेश वांद्रे,  चेतन बांदीवडेकर, भरमू पाटील, शशिकांत पेडणेकर, विजयकुमार गावडे उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment