अडकूर व निट्टूर हायस्कूलमध्ये शिक्षण परिषद उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2018

अडकूर व निट्टूर हायस्कूलमध्ये शिक्षण परिषद उत्साहात

निटुर (ता. चंदगड) येथील शिक्षण परिषदेत ``जादूचे चौकोन`` पुस्तकाचे प्रकाशन करताना रवींद्र देसाईश्रीकांत पाटीलविलास पाटीलगोविंद पाटीलपी. एन. पाटील आदी.

अडकूर / कोवाड – प्रतिनिधी
     चंदगड तालुक्यातील अडकूर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये तर निट्टूर येथील नरसिंह हायस्कूल येथे कोवाड केंद्रांतर्गत तिसरी शैक्षणिक परिषद उत्साहात झाली.
अडकूर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख के. आय. पाटील होते. यावेळी विविध स्कॉलरशिप परिक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार झाला. प्रमूख पाहणे म्हणून प्राचार्य डी. जी. कांबळे उपस्थित होते. संदिप कदम यानी प्रास्ताविक केले. माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये यश मिळवलेली आरती गावडे (आसगोळी), यश डांगे ( अलबादेवी), प्रज्ञा शोध परीक्षा साईराज भादवणकर, पृथ्वीराज आर्दाळकर (गणुचीवाडी), प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये वैभव गुरव,  प्रसाद देसाई, सायली आपटेकर (उत्साळी) या विद्यार्थांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. त्याचबरोबर नेशन बिल्डर ॲवार्ड मिळाल्याबदद्ल पोपट गायकवाड व सरीता नाईक या शिक्षकांचा सत्कार झाला. विजय ढोणुक्षे, तुकाराम कदम,  राजू हेंडोळे,  श्री. तिबिले यांनी मार्गदर्शन केले. केंद्र समन्वयक म्हणून संदिप कदम, बाळू राम नाईक यानी काम पाहिले. या परिषदेला अडकूर आमरोळी केंद्रातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
     निटूर तालुका चंदगड येथे कोवाड केंद्रांतर्गत तिसरी शैक्षणिक परिषद उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र देसाई होते. परिषदेचे उद्घाटन केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी केले. स्वागत वर्गसमन्वयक विलास पाटील यांनी केले. प्रास्ताविक पी. जी. नागेनटी यांनी केले. शिक्षण परिषदेत तज्ञसाधन व्यक्ती बाळकृष्ण मुतकेकर व मनोज बुच्चे यांनी अध्ययन स्तर टप्पा क्रमांक एक व दोन यातील तुलनात्मक विश्लेषणासह अध्ययन निष्पत्ती व विषय निहाय कृती मालिका व प्रश्न निर्मिती आदीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत केंद्रातील दहा प्राथमिक आठ माध्यमिक सह एकवीस शाळातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सहभाग घेतला. यावेळी कोवाड येथील श्रीराम विद्यालयाचे प्रा. अरविंद पाटील यांनी लिहिलेल्या `गणित विषयक जादूचे चौकोन` या पुस्तकाचे प्रकाशन झाले. परिषदेत मुख्याध्यापक सुधीर मुतगेकर, मनोहर खादरवाडकर, सौ. पी. एन. पाटील, एम. बी. पाटील, प्रेमिला बामणे, गोविंद पाटील, बळवंत लोंढे, प्रभाकर राजगोळकर,  विजय पाटील,  अनंत पाटील उपस्थिती होते.


No comments:

Post a Comment