![]() |
आमदार संध्यादेवी कुपेकर |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड हे
तालुक्याचे ठिकाण आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हा वाहतुकीची कोंडी होऊ
नये म्हणून बाह्यवळण रस्ता मंजूर करून घेतला आहे. परंतु आपल्या विभागाकडून सन 2018
च्या प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये या बाह्यवळण रस्त्याची रुंदी 45 मीटर
दाखवण्यात आलेली आहे. ती कमी करुन 20 मीटरपर्यंत ठेवावी. अशी मागणी चंदगड विधानसभा
मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी प्रादेशिक विकास योजनेच्या
उपसंचालकाकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, चंदगड शहरातून हेरे
रस्त्याला जाण्याकरिता मुख्य बाजारपेठेतून एक रस्ता जातो. आझाद गल्लीतूनही एक
रस्ता हेरे रस्त्याकडे जातो. त्यामुळे नव्याने सुचित करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यावरून
फक्त वाहनेच जावेत अशी चंदगड वासीयांची धारणा आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याकरिता
प्रादेशिक आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेले 45 मीटरची
रुंदी अवाजवी आहे. नजिकच्या काळामध्ये चंदगड नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे.
त्यामुळे चोहोबाजूला विकास करताना आपण दर्शविलेल्या रुंदीच्या बाहेरच संबंधितांना
काम करावे लागेल. त्यामुळे या बाह्यवळण रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या शेतकरी
रहिवासी बांधवांचे नुकसान होणार आहे. चंदगड शहरांमधील या बाह्यवळण रस्त्याच्या
रुंदीमुळे मुस्लिम समाजाच्या पवित्र स्मशानभूमीचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
त्याचाही प्राधान्याने आपण विचार करावा. वरील सर्व बाबींचा विचार करून भविष्यात
निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रस्त्याची रुंदी 45 मीटर ऐवजी
ठेवल्यास योग्य होईल असे मला वाटते. तरी याबाबत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन वर नमूद
केलेल्या बाबींची पडताळणी करून प्रादेशिक विकास आराखड्यात सुचित करण्यात आलेले
रुंदी कमी करण्यात यावी अशी मागणी आमदार श्रीमती कुपेकर यांनी प्रादेशिक विकास योजनेच्या उपसंचालकाकडे
पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment