दौलतच्या आडवे येणाऱ्यांची गय नाही, दौलत कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2018

दौलतच्या आडवे येणाऱ्यांची गय नाही, दौलत कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत निर्णय


हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कार्यस्थळावर दौलत बचाव संदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना बैठकीचे निमंत्रक अॅड. संतोष मळवीकर, व्यासपीठावर  भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, विजय देवणे, राजेश पाटील, प्रभाकर खांडेकर, सुनिल शिंत्रे, एम. जे. पाटील, भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, प्रा. एन. एस. पाटील आदी. 
मजरे कारवे / प्रतिनिधी

कोणत्याही परिस्थितीत दौलत सुरू करायचा. मात्र दौलत सुरू करत असताना दौलतच्या आडवे येणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशी भूमिका दौलत कार्यस्थळावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे होते.

प्रास्ताविक बैठकीचे निमंत्रक ॲड. संतोष मळवीकर यांनी करून ही बैठक निर्णायक आहे. कारखाना सुरू होण्यासाठी ठोस निर्णय होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्याच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी या मेळाव्यास उपस्थित राहणे गरजेचे असताना अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

      माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील म्हणाले, ``दौलत चालू व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी जिल्हा बँकेला कसे वटणीवर आणायचे ते बघा. जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची जमीन शासनाचे अधिकारी कशी काय विकू शकतातदौलत सुरू करण्यासाठी कुठल्या विचाराने जावे ते ठरवा.``

विजय देवणे म्हणाले, ``दौलतसाठी दोन लढाया लढाव्या लागणार आहेत. पहिली सरकार बरोबर व दुसरी जिल्हा बँकेबरोबर. 7 डिसेंबर च्या जमिनीचा लिलाव  रद्द करावा. अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. चंदगड करांचे या कारखान्यावर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुणीही दौलत वर तोंडसुख घेत असेल तर ताबडतोब उत्तर द्या. मागील उनी-धुनी न काढता सर्वांनी एकत्र येऊन दौलत बाबत एकजुटीने निर्णय घ्यावा लागेल.``

न्यूट्रियन्स सोबत 139 कोटी रुपयांचा करार झाला होतामात्र फक्त 90 कोटी लाच कंपनीला हा कारखाना दिला होता. त्यात शेतकरी कामगार यांची देणी नाहीत. पुढील टेंडरमध्ये देण्याबाबत विचार झाला पाहिजेत. यापुढे कोणीही कारखाना चालू देत सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करूयात. असे मत दौलत चे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले.

कंपनीला घातलेल्या ज्या शर्ती व अटी होत्यात्याच शर्ती व अटींवर तालुका संघाला दौलत चालवावयास दिला तर संघाची तयारी आहे. हे आम्ही संघाच्या संचालक मंडळ बैठकीत ठरविले आहे. यासाठी सर्वांची सहकार्याची भावना हवी. मागील देण्याचा हट्ट धरून काहीही साध्य होणार नाही. सक्षम पार्टीला कारखाना यापूर्वीही दिला होतामात्र त्याचा काय परिणाम झालाहे तालुक्यातील जनतेला माहीत आहे. प्रगतशील तालुक्याला दौलत बंद झाल्याने काळा डाग पडला असल्याचे मत जिल्हा बँक व गोकुळचे संचालक राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

एव्हीएच तालुक्यातून हद्दपार व्हावा व दौलत सुरू व्हावा अशी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची मागणी होती. सगळ्यांच्या सहकार्याने गेला मात्र दौलत कडे येथील लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले असल्याचे मत प्रा सुनील शिंत्रे यांनी व्यक्त केले.

दौलत बाबत टेंडर लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी प्रभाकर खांडेकर यांनी व्यक्त केली. फक्त हसन मुश्रीफ व सतेज पाटील यातून मार्ग काढू शकतातअसे मत बाळासाहेब कुपेकर यांनी व्यक्त केले. येणाऱ्या नवीन कंपनीला हा कारखाना 140 कोटी लाच द्यावा लागेलअशी स्पष्ट कबुली हसन मुश्रीफ यांनी दिली असल्याचे मत प्रा.  एन.  एस. पाटील यांनी व्यक्त केले. एम. जे. पाटीलजे. बी. पाटीलकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी सभापती शांताराम पाटीलसभापती बबनराव देसाईदौलतचे व्हाईस चेअरमन संजय पाटीलजि. प. सदस्य सचिन बल्लाळशिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल दळवीभैयासाहेब कुपेकरश्वेता नाईकशांता जाधवकृष्णराव रेंगडेगोविंद पाटील यांचेसह कामगार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                             मेळाव्यातील संम्मत झालेले ठराव....

दौलत सहकारी साखर कारखाना चालविण्यास देणेची निविदा जिल्हा बँकेने त्वरीत प्रसिध्द करावी. 7 डिसेंबर 2018 रोजीची दौलत कारखाना जागेची विक्री जिल्हा प्रशासनाने त्वरीत थांबवावी. दौलत कारखाना आजारी व बंद कारखाना म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित करावा. 14 नोव्हेंबर 2018 रोजी राज्य सरकारने बंद व आजारी कारखाना निकषाप्रमाणे दौलतला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे. दौलत कारखान्यातील शेतकऱ्यांची थकीत देणी त्वरीत मिळावीत. दौलत कारखान्यातील कामगारांची देणी त्वरीत देणेत यावीत. हे सर्वही ठराव उपस्थित कामगार व शेतकऱ्यांनी एकमताने मंजूर केले.
मेळाव्याला उपस्थित शेतकरी, सभासद, कामगार व इतर (छायाचित्र - अनिल धुपदाळे, चंदगड)


4 comments:

Unknown said...

मतभेद बाजूला ठेऊन कारखाना वाचवा

Unknown said...

सगळे चुतीया बनवतात।।।।आपल्याला
आज ह्या पार्टीत तर उद्या दुसऱ्या पार्टी त

Unknown said...

Magriche aasru aahet aaj saglanche karan aanekana layki nastana Sudha aamdarkiche swapan padat aahet tyamule savad pavitra ghene aavshak aahe

Lucky said...

कारखाना मोडून खालेल्यांना स्टेज वर कोणी घेतलं

Post a Comment