चंदगड नगरपंचायतीचे शिफारस पत्र मुख्यमंत्री कार्यालयात सादर - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2018

चंदगड नगरपंचायतीचे शिफारस पत्र मुख्यमंत्री कार्यालयात सादर

चंदगड चंदगड नगरपंचायतीचे शिफारस पत्र मुख्यमंत्री कार्यालयात सादर करताना भाजपा नेते रमेशराव रेडेकर, कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, कृती समितीचे सदस्य सुनिल कानेकर, चंद्रकांत दानी, अॅड. विजय कडुकर व इतर.


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायत किंवा नगरपरिषद करण्यात यावी. अशा आशयाचे मागणी पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 27 नोव्हेंबर 218 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. हे पालकमंत्री श्री. पाटील यांचे शिफारसीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात नगरविकास विभागाचे मुख्य सचिवांना देण्यात आहे.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी शिफारसपत्रात चंदगड हे तालुक्यातील ठिकाण असुन या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. चंदगडचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायतीला सविधा पुरवता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी नगरपंचायत कींवा नगरपरिषद दर्जा देण्यात यावा असे पत्र मुख्यमंत्री श्री. फडवणवीस यांना दिले होते. हे शिफारसपत्र आज मुख्यमंत्री कार्यालयात कार्यकर्त्यांनी केले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते रमेशराव रेडेकर, कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, तालुका अध्यक्ष नामदेवराव पाटील, कृती समितीचे सदस्य सुनिल कानेकर, चंद्रकांत दानी, अॅड. विजय कडुकर, मल्हार शिंदे, प्रविण होडगे उपस्थित होते.



No comments:

Post a Comment