चंदगड तालुक्यात
पिकांच्यावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून खास
पथकाद्वारे हुमणी किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना
करण्याबाबत संबंधित विभागाला सुचना द्याव्यात. अशी मागणी चंदगड विधानसभा
मतदारसंघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी महसुल, कृषी व पालकमंत्री
चंद्रकांतदाद पाटील यांच्याकडे केली आहे.
चंदगड तालुक्यामध्ये भात,
भुईमुग, सोयबीन, ऊस पिकात हुमणी किडीमुळे ऊस मुळापासून नष्ट करणाऱ्या या किडीने
शेतकरी त्रस्त झालेले आहेत. याकरिता वारेमाप किटकनाशके वापरुनही शेतकरी नियंत्रण
मिळवू शकलेले नाहीत. तालुक्यातील नद्यांना यावर्षी दोनवेळा पूर आल्यामुळे
नदीकाठच्या ऊसांची पिके कित्येक दिवस पाण्याखाली होती. याचा अधिक फटका ऊस पिकाला बसला
आहे. तालुक्यातील अंदाजे 40 टक्के ऊस उत्पादन घटण्याची भिती निर्माण झाले. येथील
शेतकरी कष्टाळू आहे, किडीपासून संरक्षण मिळाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
पण त्याला म्हणावे तसे यश मिळत नाही. त्यामुळे कृषी विभागाकडून खास पथकाद्वारे
हुमणी किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना करण्यासाठी संबंधीत
विभागास सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार कुपेकर यांनी केली आहे.