सर्वांनी सहकार्य केल्यास दौलतचा शिवधनुष्य उचलणार - राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2018

सर्वांनी सहकार्य केल्यास दौलतचा शिवधनुष्य उचलणार - राजेश पाटील

अडकुर (ता. चंदगड) येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल राजेश पाटील यांचा सत्कार करताना नवमहाराष्ट्रचे अध्यक्ष महादेव पाटील, ज. गा. पाटील, अनिल सुरुतकर, अभय देसाई, जी. ए. गणाचारी व तानाजी गडकरी आदी मान्यवर

अडकूर / प्रतिनिधी
सर्वसामान्य शेतकऱ्यांची दैवत असणारा दौलत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी चंदगड तालुक्यातील सर्वच गटानी सहकार्य केल्यास दौलतचा शिवधनुष्य उचलणार असल्याचे विचार जिल्हा बँके व गोकुळचे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यानी केले. नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगावच्या वतीने जिल्हा बँक संचालकपदी व चंदगड तालुका संघाला सहकार भुषण मिळाल्याबद्दल राजेश पाटील यांचा अडकूरच्या श्री शिवशक्ती हायस्कूल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील होते.
संचालक श्री. पाटील म्हणाले, ``दौलत हा सहकारातच चालायला हवा. युवकाना दौलतच्या माध्यमातून काम व दाम मिळायला हवे. यासाठी चंदगड तालूक्यातील सर्वच राजकीय सहकार्य केले तर तालूका संघाच्या माध्यमातून दौलतचा शिवधनुष्य उचलणार आहे. संघाला मिळालेला पुरस्कार हा संघाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या निस्वार्थी सेवेची पोचपावती आहे. केडीसी संचालक पदासाठी विरोधकांचेही सहकार्य लाभले असून याचा लाभ सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी करणार असल्याचे सांगितले. ``
प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य डी. जी. कांबळे यांनी केले. स्वागत एस. के. हरेर यानी केले.  मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर राजेश पाटील यांचा महादेव पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ज. गा. पाटील, आर. व्ही. देसाई, बाळू चौगूले,  अभयबाबा देसाई, आर. डी. पाटील, आर. एस. देसाई,  बी. बी. कुराडे, बी. वाय. सोनार यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला तानाजी गडकरी, अनिल सुरूतकर, गजानन कुंभार यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते. सुत्रसंचालन आर. एस. देसाई यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. जी. पाटील यांनी मानले.