शरीराच्या सुंदरतेपेक्षा हृदयाच्या सुंदरतेला जपा - खासदार धनंजय महाडीक - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2018

शरीराच्या सुंदरतेपेक्षा हृदयाच्या सुंदरतेला जपा - खासदार धनंजय महाडीक


पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका मेडिकल असोशियनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी दिपप्रज्वलन करताना खासदार धनंजय महाडिक, बाजुला मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी. 
मजरे कार्वे / प्रतिनिधी 
आजचा शेतकरी लवकर तयार होणारा भाजीपाला फळे पिकवायला लागला. रासानिक खते व कीटकनाशकांच्या फवारणीमुळे सात्विक आहार बाजारात मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शरीरात अनेक आजार उद्भभवायला लागले. मनुष्य दैनंदिन जीवनातील आपलं बजेट ठरवतो. मात्र आजाराचे बजेट निश्चित नसल्याने मानसिक संतुलन बिघडते. योग्य आहार आणि व्यायाम यांची जोड शरीराला लागली पाहिजे. शरीराच्या सौंदर्यापेक्षा ह्रदयाचे सौंदर्य व सुदृढता जो अधिक जपतो  तोच निरोगी आयुष्य जगू शकतो, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी चंदगड तालुका मेडिकल असोशियनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी व्यक्त केले. यावेळी  अध्यक्षस्थानी डॉ. रमाकांत जोशी हे होते .
डॉ. संजय पोरवाल,  डॉ. मंजुनाथ यांनी ह्रदय रोग व मधुमेह या आजाराबाबत यावेळी उपस्थितीना मार्गदर्शन केले. तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ पाटील यांनी यावेळी उपस्थिताचे स्वागत केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील,  डॉ. सुभाष पाटील, डॉ. विलास पाटील, डॉ. संजीव पाटील,  मायाप्पा पाटील,  महादेव सांबरेकर, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रमेश हुदार, शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील, ॲड. संतोष मळवीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी – 23-11-18 – पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका मेडिकल असोशियनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी दिपप्रज्वलन करताना खासदार धनंजय महाडिक, बाजुला मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी.