कालकुंद्री येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅस संच वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2018

कालकुंद्री येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅस संच वितरण

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी संचाचे वितरण भाजपचे युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य भरमु तातोबा पाटील यांचे हस्ते झाले.

कालकुंद्री / प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत कालकुंद्री (ता. चंदगड) येथे अठरा लाभार्थीना स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर व शेगडी संचाचे वितरण करण्यात आले. भाजपचे युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य भरमु तातोबा पाटील यांचे हस्ते सिलेंडर शेगडी व साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी गॅस संचाचा चांगल्या पद्धतीने वापर करून आपले जीवनमान उंचवावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस पाटील संगीता कोळी, दत्तू पाटील, मनोहर पाटील, विनायक पाटील, दशरथ पाटील,  शशिकांत सुतार, भरत पाटील, मारुती पाटील,  कृष्णा खवणेवाडकर, कल्लाप्पा बागीलगेकर, विजय परीट, उत्तम कोळी यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार पांडुरंग गायकवाड यांनी मानले.