मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडचे अध्यक्ष तजमुल फनीबंद, इस्माईल शहा, सिकंदर नाईक, अमीरहाम्जा शेरखान. |
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या
वतीने अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगड मार्फत महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण
या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील मुस्लिम
समाज ग्रामीण व शहरी भागातील अविकसित भागात वास्तव्य करतो. मुस्लिम समाजातील
पारंपारीक व्यवसाय डबघाईला आले आहेत. नोकरीतील प्रमाण अत्यल्प आहे. सामाजिक स्तर
खालावलेला आहे. लोक हात मजुरी, कृषी मजुर, गाडी ठेला यासारखे व्यवसाय करुन आपली
गुजरान करत आहेत. त्यामुळे मुस्लिम आरक्षण द्यावे. यावेळी अंजुमन ए इस्लामचे
अध्यक्ष तजमुल फणीबंद, संचालक ईस्माइल शहा, अमीरहाम्जा
शेरखान, सिकंदर नाईक, ओबीसीचे
जिल्हाअध्यक्ष रफीक भाई शेख व मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
होते.