धामणे धनगरवाड्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानकडून भेटवस्तुचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2018

धामणे धनगरवाड्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानकडून भेटवस्तुचे वाटप

धामणे (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने संसारोपयोगी भेटवस्तुचे वाटप करण्यात आले. 

हलकर्णी / प्रतिनिधी
दिवाळी सण म्हटल की सर्वत्र आनदांचे वातावरण असते. पण समाजात सर्वच ठिकाणी दिवाळी सण साजरा होतो असे नाही. सर्वत्र प्रसन्नता आणि दिव्यांच्या प्रकाशाने झगझगमगाट असला तरी काही ठिकाणी अंधारच असतो. दिवाळीच्या झगमगाटापासून दुर असलेल्या चंदगड तालुक्यातील धामने (ता. चंदगड) येथील धनगरवाडयावर दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत गरजूना भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले.
दुर्गविर प्रतिष्ठानेचे नंदु चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जॉय ऑफ हॅपीनेस या उपक्रमातुन गरजूनादिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न दुर्गवीरचे संतोष हासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. प्रतिष्ठानमार्फत धनगरवाड्यारील जेवणाचे ताट, वाटी असा संच देऊन धामणे येथील धनगरवाडयावर नागरिकांची दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी दुर्ग प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.