![]() |
पाटणे फाटा-माणगाव (ता. चंदगड) येथील रस्त्याची झालेली दुरावस्था. (छायाचित्र - निवृत्ती हारकारे, कारवे) |
कारवे / प्रतिनिधी
चंदगड
तालुक्यातील पाटणे फाट्यापासून माणगाव पर्यंतचा
राज्य मार्ग सद्या दुर्दशेच्या फेऱ्यात अडकला आहे. बेळगाव-वेंगुर्ला
मार्गापासून किणी-कर्यात भागाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर प्रचंड
प्रमाणात वाहतुकीचा ताण आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना
तारेवरची कसरत करावी लाग आहे. रस्यामध्ये पडलेल्या खड्यामुळे प्रवाशांचे हाल होत
असून हा रस्ता त्वरीत दुरुस्त करुन वाहतुकयोग्य करावा अशी मागणी वाहनधारकांतून होत
आहे.
तालुक्याच्या
पश्चिम भागात कडून आणि तुडीये विभागाकडूनही ओलम शुगर कडे उसाची वाहतूक करणारा हा
प्रमुख मार्ग आहे. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी पाटणे फाटा ते माणगाव या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले
होते. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले
आहे. चंदगड तालुक्यातील प्रमुख मार्ग डागडुजी करून पूर्ण झाले आहेत. मात्र या
रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. माणगाव पासून
कोवाड पर्यंत सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र माणगाव ते पाटणे फाटा
या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यातील खड्डे लवकरात लवकर भरावेत व रस्ता
वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी जोर धरत आहे. बसर्गे ते गौळवाडी दरम्यान या
रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये नियमित लहान-मोठे अपघात
होत आहेत. त्यामुळे येथे कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम
विभागाने लक्ष लक्ष देऊन त्वरित वाहतुकी योग्य करावा अशी मागणी वाहनधारकांतून होत
आहे.