चंदगड / प्रतिनिधी
महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे उद्गाते
होते. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची मूळ संकल्पना त्यांचीच होती. 19 व्या
शतकातील समाजसुधारणेच्या चळवळीस चालना देणारा महापुरुष म्हणून त्यांचे महत्व
अनन्यसाधारण असल्याचे उद्गार प्रा. एस. बी. दिवेकर यांनी काढले. चंदगड येथील र.
भा. माडखोलकर महाविद्यालयातील संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाच्या संयुक्त
कार्यक्रमात बोलत होत्या. महाविद्यालायाच्या खेडूत प्राध्यापक प्रबोधिनी व इतिहास
विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील
यांनी संकटे व मानहानी सोसून महात्मा जोतिराव फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या
कार्याचा परिचय करुन दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचे युग अवतरण्यासाठी
अविरत प्रयत्न केल्याचे प्रतिपादन केले. प्रारंभी प्रा. एस. के. सावंत व प्राचार्य
डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालायातील विद्यार्थी
कै. परशराम विठ्ठल कोराने याला श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. टी. एम. पाटील
यांनी सुत्रसंचालन होते. प्रा. एस. डी. गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास
महाविद्यालायतील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment