ओलम शुगरच्या वतीने ऊस व्यवस्थापन पध्दतीबाबत पुणे येथे तीन दिवसांची कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2018

ओलम शुगरच्या वतीने ऊस व्यवस्थापन पध्दतीबाबत पुणे येथे तीन दिवसांची कार्यशाळा संपन्न

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम शुगरच्या वतीने पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये तीन दिवसाची निवासी कार्यशाळेत बोलताना ओलमचे बिझनेश हेड भरत कुंडल, समोर उपस्थित महिलावर्ग. 

चंदगड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम शुगर साखर कारखान्याच्या वतीने ऊस व्यवस्थापनबाबत चंदगड, आजरा व गडहिंग्लज येथील 200 महिलांना पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये तीन दिवसाची निवासी कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये तिन्ही तालुक्यातील दोनशे महिलांनी सहभाग नोंदवून तीन दिवसाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
यावेळी ओलम शुगरचे बिझनेस हेड भरत कुंडल म्हणाले, ``शेती उद्योगातील उस उत्पादन व्यवसाय हा महत्त्वाचा असून यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करा. शेतकऱ्याने एकरी उत्पादन कसे वाढवता येईल याचा पुरेपूर अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे उत्पादन वाढवावे. अलीकडच्या पाच वर्षात ओलमने इतरांच्या मानाने जास्त दर दिला आहे. साखरेच्या उत्पादनामध्ये कारखान्याने चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तीन तालुक्यात ओलमने विश्वासाहर्ता निर्माण केली असल्याचे सांगितले. यासह महिलांना ऊस लागवडीसाठी सुधारित व्यवस्थापन पद्धतींवर प्रशिक्षित देण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम "सिलिदरिदाद" गहू लागवडीमध्ये कायमस्वरूपी काम करणाऱ्या एनजीओच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज येथे ऊस लागवडीतील उत्पादकता सुधारण्यासाठी सोलिडरायडड गेल्या पाच वर्षांपासून ओलम शुगरसोबत काम करत आहे.

महिलांना प्रत्यक्ष शेतामध्ये प्रात्यक्षिक दाखविताना.