हत्तीबाधीत क्षेत्रातील ऊसाची त्वरीत उचल करण्यासाठी उपवनसंरक्षकांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2018

हत्तीबाधीत क्षेत्रातील ऊसाची त्वरीत उचल करण्यासाठी उपवनसंरक्षकांना निवेदन


कलिवडे (ता. चंदगड) परिसरातील हत्तीबाधीत क्षेत्रातील ऊस त्वरीत उचल करावा. या मागणीचे निवेदन उपवनसंरक्षक वनविभाग कोल्हापुर श्री. धुमाळ यांना देताना.
कलिवडे (ता. चंदगड) येथील हत्तीने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांनी त्वरीत उचल करावा. अशी मागणी कलीवडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अमृत कांबळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपवनसंरक्षक वनविभाग कोल्हापुर श्री. धुमाळ यांच्याकडे दिले आहे.
कलीवडे परीसरात आठ ते दहा दिवसापासुन हत्तीने या परीसरातील ऊस, भात, नाचणा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. त्यातच ऊस दराच्या आंदोलणामुळे हत्तीने नुकसान केलेला ऊस शेतात पडुन आणखी नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील हेमरस व नलवडे साखर कारखान्यांनी हत्तीबाधीत कलीवडे, किटवडे, जंगमहट्टी, कळसगादे, पार्ले या परिसरातील ऊस ऊचल लवकर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पचंनामे करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अशोक कदम, सरपंच पी. डी. पाटील, विजय गावडे, निवृत्ती गावडे उपस्थित होते.