अस्वलाच्या हल्यात उमगाव येथील युवक गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2018

अस्वलाच्या हल्यात उमगाव येथील युवक गंभीर जखमीशंकर विठ्ठल गावडे

उमगांव (ता. चंदगड) येथे शेतातील घराकडे जनावारांना वैरण टाकण्यासाठी गेलेल्या शंकर विठ्ठल गावडे (वय-22) या युवकावर जंगली अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. आज सकाळी साडेआठ वाजता हि घटना घडली. यासंदर्भात माहीती अशी – उमगाव गावाच्या पूर्वेकडे असलेल्या शेतात शंकर गावडे यांचे जनावारांसाठी बांधलेले घर आहे. या घरात असलेल्या जनावारांना शंकर वैरण टाकण्यासाठी सकाळी येत होता. त्याच वेळी झुडपात बसलेल्या अस्वलाने शंकर यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने केलेल्या हल्यात उजवा हात, डाव्या पायाची मांडी व पंजा यांना गंभीर दुखापत झाली आहे. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात प्राथमिक उपचार करुन त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णांलयता हलविण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेचा पंचनामा प्रभारी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अस्मिता घोरपडे, माणिक खोत, चंद्रकांत पावसकर, गुंडू देवळी, तुकाराम जाधव या पथकाने केला. जखमी शंकर गावडे यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.