माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमदान - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2018

माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमदान


चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने श्रमदान करण्यात आले. स्वागत प्रा. व्ही. के. गावडे यांनी केले. श्रमदानासाठी महाविद्यालयाचा सर्व परिसर कचरामुक्त करुन स्वच्छ परिसराच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानात योगदान दिले. यावेळी प्रा. एस. एन. पाटील एनएसएस युनिटच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी प्रतिनीधींची निवड केली. विद्यार्थी प्रतिनीधी शिवाजी पाटील, विद्यार्थीनी प्रतिनिधी शुभांगी मुळीक हिची निवड कऱण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद `नाट मी, बट यू` सार्थ ठरेल. अशी संकल्पना यावेळी प्रत्यक्षात उतरविली. एका गरजू स्वयंसेवकाला आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी प्रा. व्ही. के. गावडे, डा. एन. के. पाटील प्रा. शाहू गावडे, डा. एन. एस. मासाळ, प्रा. ए. डी. कांबळे उपस्थित होते. आभार डॅ. एन. के. पाटील यांना मानले.