हिंडगाव ग्रुपग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2018

हिंडगाव ग्रुपग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामांचा शुभारंभ


हिंडगाव (ता. चंदगड) येथील ग्रुप-ग्रामपंचायतीमार्फत चौदाव्या वित्तआयोगातून सात लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ सरपंच सौ. पुनम फाटक व उपसरपंच गुणाजी भोसले यांच्या उपस्थितीत झाला. स्वागत ग्रामसेवक एन. सी. गवळी यांनी केले. रस्ता खडीकरण डांबरीकर, मोरी व शाळेचे कंपौंड असा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विनायक खांडेकर, बाळू नाईक, राजश्री फाटक, संगिता फाटक, पुजा भातकांडे, प्रिया नाईक, सोसायटी चेअरमन तुकाराम फाटक, व्हाईस चेअरमन सडू म्हस्कर, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम फाटक, विल्स्न राड्रीक्स, माणिक देशपांडे, मारुती फाटक आदी ग्रामस्थ उपस्थि होते.