चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंचायत
समितीस भेट दिली. प्रास्ताविक संजय चंदगडकर यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान
शाखेच्या प्रथमवर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचे
स्वरुप जाणून घेण्यासाठी ही भेट दिली. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाही
निवडणूक व सुशासन हा अनिवार्य अभ्यासक्रम सुरु झाला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ
सांस्कृतिक ज्ञान मिळवण्याऐवजी प्रत्यक्ष कार्यप्रणाली समजून घ्यावी. या हेतूने महाविद्यालयाने
या उपक्रमाचे आयोजन केले होतो. नियोजन विभाग, सभा कामकाज, शिक्षण अर्थ, बांधकाम,
महिला व बालकल्याण, आरोग्य ग्रामपंचायत शेती, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा ही
विविध कामे कशी चालतात. तसेच या संदर्भातील शासकीय योजनांचे स्वरुप जाणून शंका
निरसनही करुन घेतले. यावेळी एन. बी. हालबागोळ, अमर गारवे, श्री. शेळके, सौ. एस.
एस. प्रभू, ए. पी. गजगेश्वर, श्री. ठोंबरे, एस. आर. दानवाडकर, बी. एस. शेंडे या
अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाचे कामकाज, योजना, जिल्हास्तरीय कार्यपद्धतीबाबत
मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी
सहकार्य केले. सुत्रसंचालन प्रा. टी. एम. पाटील यांनी केले. आभार प्रा. एस. व्ही.
कुलकर्णी यांनी मानले.
07 November 2018
Home
chandgad
माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचायत समितीला भेट