मुरकुटेवाडी येथे पाणंद रस्त्याचे तहसिलदारांच्या उपस्थितीत रुंदीकरण - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2018

मुरकुटेवाडी येथे पाणंद रस्त्याचे तहसिलदारांच्या उपस्थितीत रुंदीकरण


मुरकुटेवाडी येथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावाशेजारी पाणंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. साडेपाच किलो मीटरच्या पाणंद रस्त्याची निर्मिती करणे, ही कौतुकाची बाब आहे. पाणंद रस्त्याच्या खडीकरणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करुन पुर्ण केले जातील. अशी विविध समाजोपयोगी कामे करा, जिथे गरज असेल तिथे प्रशासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहिल. अशी ग्वाही चंदगडचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी केले. मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील गावच्या बाजूला शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शुभांगी मुरकुटे होत्या. 
प्रास्ताविक प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी या पाणंद रस्त्याचे उद्घाटन शिवाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनशळे, तलाठी राजश्री पचंडी, शरद नाकाडी, चंद्रकांत पाटील यांच्यासह उपसरपंच संगीत गोजगेकर, ग्रा. पं. सदस्या शिला चव्हाण, आरती जाधव, परशराम दळवी, पोलिसपाटील सखाराम जाधव, परशराम गोनगेकर, शिवाजी जाधव उपस्थित होते. आभार डा. एन. टी. मुरकुटे यांनी मानले.