बागिलगे – डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश
बोकडे यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीमार्फत कृतीशील पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते हा
पुरस्कार प्रदान कऱण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार
देण्यात आला. त्यांना जे. बी. पाटील, मुख्याध्यापक, व्ही. एस. पाटील यांचे
मार्गदर्शन लाभले.