चंदगड येथील संभाजी चौकात सैनिकांसाठी दिपोत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2018

चंदगड येथील संभाजी चौकात सैनिकांसाठी दिपोत्सव



चंदगड येथील संभाजी चौकात अंजुमन -ए- इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगड व मुस्लिम समाज यांच्या वतीने "एक दिया सैनिक के नाम"या संकल्पनेतून दिपोत्सव साजरा करताना.
दिपावलीचे औचित्य साधून अंजुमन -ए- इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगड व मुस्लिम समाज चंदगड तालुका यांचे वतीने "एक दिया सैनिक के नाम"या संकल्पनेतून दीप प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे युवा नेतृत्व उद्योजक सुनील काणेकर  याच्या शुभहस्ते दीप प्रज्वलीत  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अंजुमन ट्रस्ट व चंदगड तालुका मुस्लिम समाज  यांचे अभिनंदन केले. अशा स्वरुपाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु. दोन्ही समाजातील लोकांना एकत्र घेऊन  असे कार्यक्रम करुन सामाजिक एकता ठेवावी. चंदगड तालुका इतरांसाठी एक आदर्श होईल असे चंद्रकात दाणी  यांनी सांगितले. ट्रस्ट चे अध्यक्ष तजमुल फणीबंद म्हणाले, ``आजच्या युवा पिढी ला धार्मिक संस्कारासोबत सामाजीक संस्कार गरजेचे आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक जाणकार मंडळीनी  यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि असे कार्यक्रम आयोजित करुन सामाजीक एकता टिकून राहिल प्रयत्न केले पाहिजेत.``यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष अल्ताफ मदार, सेक्रेटरी सल्लाउददीन नाईकवाडी, ईस्माइल शहा, उमर पाटील, अल्लाउददीन सय्यद, उस्मानअली मुल्ला,अमीरहाम्जा शेरखान, गुलज़ार शेख,नियाज मदार, गणी मुल्ला  यांच्यासह चंदगड शहरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. प्रास्ताविक जमीर आगा यांनी केले. सल्लाउददीन नाईकवाडी यांनी आभार मानले.

फोटो ओळी – 9-11-18 –