नांदवडे येथे 11 डिसेंबरला कबड्डी स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2018

नांदवडे येथे 11 डिसेंबरला कबड्डी स्पर्धेचे आयोजन



चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथे फेड्स कट्टा ग्रुपच्या वतीने 60 किलो वजनी गटासाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी 11 डिसेंबर 2018 रोजी रात्री आठ वाजता आयोजन केले आहे. नांदवडे येथील गोकुळ दुध संस्थेजवळील मैदानावर स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी 351 रुपये प्रवेश फी असून प्रथम क्रमांकासाठी 7001, द्वीतीय क्रमाकांसाठी 5001 व तृतीय क्रमांकासाठी 3001 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर बेस्ट राईडर व बेस्ट पकडसाठी व विजेत्या संघाना चषक देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी अधिक माहीतीसाठी 7038347315, 7773951623, 7057069415, 9145715036 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन ग्रुपच्या वतीने केले आहे.


No comments:

Post a Comment