चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथे मुंबई गिरणी कामगार व इपीएस 95 च्या सर्व
पेन्शनरांची मंगळवारी 11 डिसेंबर 2018 दुपारी बारा वाजता दौलत कारखाना गणपती मंदिर
येथे बैठक आयोजित केली आहे.
वाढीव पेन्शन बद्दल झालेल्या वृत्ताची माहिती व गिरणी कामगरांना
मुंबईत ज्या कंपनीमध्ये काम केले आहे. त्या जागेवरच घराचा आराखडा मिळण्याच्या
अंतिम निर्णयाबद्धल माहिती घेण्यासाठी उपस्थित राहावे. 2014 पासून रिटायर्ड
झालेल्या पेन्शनधारकांनी वाढीव पेन्शन बद्दल फॉर्म भरावेत. यासह
अन्य विषयावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. बैठकीला वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन सिद्धार्थ
पाटील, जानबा बोकडे, बाबुराव पाटील, वसंत गणाचारी, गोपाळ गावडे, शिवाजी परीट, राणबा पाटील, बाळु कुट्रे, महादेव कांबळे यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment