![]() |
बाबासाहेब मुल्ला यांचा सत्कार करताना पत्रकार संघाचे सर्व सदस्य. |
कालकुंद्री
(प्रतिनिधी)
ऑल इंडिया
मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल कोवाड (ता.
चंदगड) येथील बाबासाहेब इब्राहिम मुल्ला यांचा चंदगड तालुका पत्रकार संघाच्या
वतीने नुकताच चंदगड येथे सत्कार करण्यात आला.
श्री. मुल्ला
हे साप्ताहिक न्यूज लाईफ चे संपादक असून चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड
लाईव्ह न्युज चॅनेलचे पत्रकार व सदस्य आहेत. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर
असणाऱ्या बाबासाहेब मुल्ला यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे कामी
सातत्याने प्रयत्न केले आहेत. यामुळे त्यांना जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी त्यांचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन व चंदगड
तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय पाटील,
ए. टी. पाटील, अनिल धुपदाळे, संपत पाटील, श्रीकांत पाटील, नंदकुमार ढेरे, संतोष
सावंत-भोसले, संजय एम. पाटील, संतोष सुतार, विजयकुमार कांबळे, चेतन शेरेगार, विशाल पाटील, शहानुर मुल्ला, युवराज पाटील उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment