कालकुंद्री केंद्रांतर्गत शाळांना टेक महिंद्रा कंपनीकडून दहा संगणक प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2018

कालकुंद्री केंद्रांतर्गत शाळांना टेक महिंद्रा कंपनीकडून दहा संगणक प्रदान

 कागणी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत टेक महिंद्रा कंपनीमार्फत संगणक प्रदान करताना अमृत पाटीलतेजस कांबळे  यांच्यासह मुख्याध्यापक व्ही. पी. पाटील, भावकू गुरव, भरमू पाटीलजयवंत पाटील आदी.

कालकुंद्री (प्रतिनिधी)
कालकुंद्री (ता. चंदगड) येतील केंद्रांतर्गत केंद्रशाळा कालकुंद्री प्राथमिक शाळा, कागणी, होसुर, किटवाड, कौलगे  व ज्ञानदीप वाचनालय कालकुंद्री यांना टेक महिंद्रा लिमिटेड शारदा सेंटर पुणे कंपनीमार्फत दहा संगणक संच देणगी दाखल प्रदान करण्यात आले. याकामी कंपनीचे व्यवस्थापक व कालकुंद्री गावचे सुपुत्र अमृत गणपती पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.
यामध्ये कालकुंद्री, कागणी, होसुर, किटवाड या शाळांना प्रत्येकी दोन तर कौलगे शाळा व ज्ञानदीप वाचनालय यांना प्रत्येकी एक संगणक भेट दिला. या उपक्रमानिमित्त अमृत पाटील व तेजस कांबळे पुणे यांचा कालकुंद्री शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष अन्वर शेख यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी केंद्रप्रमुख वाय. आर. निटूरकर, मुख्याध्यापक माया पाटील यांच्यासह शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. अशाच पद्धतीने प्रत्येक प्रत्येक शाळेत कार्यक्रमावेळी शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती ,सरपंच यांची उपस्थिती होती. वाचनालयातील संगणक प्रदान कार्यक्रम प्रसंगी के. जे. पाटील, सु. ग. पाटील वाचनालय सदस्य उपस्थित होते. अमृत पाटील व त्यांच्या कंपनीचे सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल कौतुक होत आहे. संगणक उपलब्ध करून देण्यात कंपनीचे विल्सन व प्रमोद यांचेही सहकार्य लाभले. 




No comments:

Post a Comment