![]() |
तानाजी नारायण झेंडे |
चंदगड / प्रतिनिधी
सडेगुडवळे
(ता. चंदगड) येथील तरुण शेतकरी तानाजी नारायण झेंडे (वय-४०) हे अस्वलाने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झाले
आहेत. आज सायंकाळी पाच वाजता आपल्या शेतातील गवत पाहण्यासाठी गेले असता हि घटना
घडली.
आज
सायंकाळी पाचच्या दरम्यान तानाजी झेंडे हे आपल्या शेताकडील गवत पाहण्यासाठी गेले
होते. यावेळी झुडपात बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला. यावेळी त्यांनी
आरडा-ओरडा गेल्यामुळे आजूबाजुला असलेल्या लोकांनी धाव घेतल्याने अस्वल जंगलात पळून
गेले. अस्वलाच्या हल्यात त्यांच्या डोकीला, नाकाला, डोळ्यांना व खांद्याला गंभीर
दुखापत झाली आहे. अस्वलाची नखे लागल्यामुळे त्यांच्या संपुर्ण शरीरावर ओरखडे पडले
आहेत. ते गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांनी त्यांना तातडीने त्यांना चंदगड येथील ग्रामीण
रुग्णांलयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना गडहिंग्लज
येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. चंदगडचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी व कर्मचारी यांनी जखमीची भेट घेवून तात्काळ वीस
हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्याचबरोबर सरकारी निर्णयानुसार अर्थसाह्य करणार
असल्याचे वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांनी सांगितले.
तीन दिवसात दुसरा हल्ला
चंदगड
तालुक्यातील जंगली भागात मोठ्या प्रमाणात अस्वलाचा वावर आहे. शनिवारी 8 डिसेंबर
2018 रोजी उमगाव पैकी माळी येथील यशवंत गावडे हे देखील अस्वलाच्या हल्यात जखमी
झाले होते. तीन दिवसात हि दुसरी घटना असल्यामुळे लोकांच्यामध्ये भितीचे वातावरण
पसरले आहे. वनविभागाने गस्त वाढवून अस्वलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
3 comments:
Abb 😱😱
Abb 😱😱
वनविभागाने तत्काळ उपाययोजना राबवल्या पाहिजेत म्हणजे संव्रक्षण भिंत किंवा कुंपण बांधणे
Post a Comment