![]() |
होसुर (ता. चंदगड) घाटातील ओढ्याच्या पुलावर पलटी होवून चक्काचुर झालेला सिमेंटचा ट्रक. |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड-बेळगाव मार्गावरील होसुर (ता. चंदगड)
घाटातील ओढ्याच्या पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सिमेंटचा ट्रक कोसळून
झालेल्या अपघातात चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले. जयभीम बसलिंगाप्पा कट्टीमनी
(वय-45), महादेव कंडगुलकर (वय-35) व संतोष निंगाप्पा आलगुंडी (वय-38, सर्व रा.
शहाबाद, ता. शितापूर, जि. गुलबर्गा) अशी जखमींची नावे आहेत. आज दुपारी एक वाजता हि
घटना घडली.
यासंदर्भात माहीती अशी - कर्नाटकातील गुलबर्गा
येथून सिमेंट घेऊन चंदगडला निघालेला हा ट्रक (एम एच-09, बी. सी. 1924) सुपे येथील
चेक पोस्ट नाका चुकवण्यासाठी कोवाड मार्गे निघाला होता. ट्रकमध्ये चालकासह अन्य
दोन व्यक्ती होत्या. ट्रक होसूर घाटातील उताराला लागल्यानंतर ओव्हरलोड ट्रकवरील
चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यावेळी ट्रकमधील सिमेंटची पोती ओढ्यात उडून
पडली. यातील एकाने ट्रक पलटी होत असताना उडी मारली. तर चालक व क्लिनर हे
केबीनमध्ये अडकले. त्यांना रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ट्रकमधून बाहेर
काढून उपचारासाठी बेळगाव येथे हलवले. यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला होता.
No comments:
Post a Comment