चंदगड / प्रतिनिधी
स्वच्छंद विचार मंच चंदगड, रवळनाथ माध्यमिक
विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 23 डिसेंबर 2018
रोजी सकाळी साडेदहा वाजता `शब्दसिध्दी` चषक तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. चंदगड येथील रवळनाथ
पतसंस्थेच्या हॉलमध्ये वरिष्ठ आठवी ते दहावी गट व कनिष्ठ पाचवी ते सतावी या गटात
स्पर्धा होतील. स्पर्धेेचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे.
आठवी ते दहावीच्या वरिष्ठ गटाच्या पहिल्या पूर्वतयारी
वक्तृत्व स्पर्धा फेरीसाठी सात मिनिटांचा कालावधी असून दहा रुपये नोदणी शुल्क आहे.
यासाठी 1) व्यक्ती आणि वल्लीमधला पूल : पु. ल. देशपांडे 2) वनभक्षकांच्या उलट्या
बोंबा, गावाकडं सुटलाय वाघोबा 3) मौज, मजा, मस्ती जिंदगी
नाय सस्ती, दहावीच्या
स्टेशनवरच नाही वस्ती, अजून घडवायची
आहे हस्ती! 4) संत तुकाराम ते तुकाराम : एकाची बुडवली गाथा, तर दुसऱ्याला टिकूच
कुठं देता? ५) सोशल मीडिया
: कमेंट, लाईक व व्हायरलचा मांडलाय नुसता खेळ, भावना, संस्कार नि एकोप्याचा कसा घालावा मेळ? ६)
मधाळ,रसाळ तर कधी खडी, जगात भारी बोली माझी 'चंदगडी' हे विषय असतील. दुसऱ्या फेरीमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा
फेरीसाठी दोन मिनिटांचा कालावधी असून उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकाला
ऐनवेळी चिठ्ठीद्वारे येणाऱ्या सोप्या विषयावर बोलावे लागेल. दोन्ही स्पर्धेतील
संयुक्त गुणांकनावरून पारितोषिक प्राप्त स्पर्धक ठरवले जातील. यासाठी अनुक्रमे
प्रथम क्रमांकासाठी 2101, द्वीतीय क्रमांकासाठी 1501, तृतीय क्रमांकासाठी 1001 व उत्तेजनार्थसाठी
701 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
पाचवी ते सातवीच्या कनिष्ठ गटाच्या पहिल्या पूर्वतयारी
वक्तृत्व स्पर्धा फेरीसाठी पाच मिनिटांचा कालावधी असून दहा रुपये नोदणी शुल्क आहे.
यासाठी विषय १) आमचा खरा हिरो : छत्रपती संभाजी महाराज, २) काय हवंय आम्हांला, बालपण की पणाला लावलेला 'बाळ'?, ३)पांढरा सदरा पांढरी टोपी, देशहिताला
लागली ओहोटी ४)स्वाभिमान माझा, महाराष्ट्र माझा ५) कार्टून मालिकांत हरवला
दिवास्वप्नात बुडाला, उद्याचा सुपरहिरो (विद्यार्थी) कुठं बरं हरपला? असे आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा फेरीसाठी एक
मिनिटांचा कालावधी असून उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकाला ऐनवेळी
चिठ्ठीद्वारे येणाऱ्या सोप्या विषयावर बोलावे लागेल. पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेत
गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या आठ स्पर्धकांना उत्स्फूर्त स्पर्धेत बोलणे आवश्यक आहे.
दोन्ही स्पर्धेतील संयुक्त गुणांकनावरून पारितोषिक प्राप्त स्पर्धक ठरवले जातील.
विजेत्यांना अनुक्रमे 1201, 1001, 701 व उत्तेजनार्थ 501 अशी बक्षिसे देण्यात येतील.
सर्व पारितोषिकप्राप्त स्पर्धकांना रोख पारितोषिकासह गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरवण्यात येईल. प्रत्येक सहभागी
स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देणेत येईल. तरी इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी 9423839035,
8806233621, 9421206646, 7218450267 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment