हेमरस साखर कारखान्याकडून 26 डिसेंबर ते 6 जानेवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2018

हेमरस साखर कारखान्याकडून 26 डिसेंबर ते 6 जानेवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन


कोवाड / प्रतिनिधी
हेमरस साखर कारखान्याकडून ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. २८ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटचे शास्त्रज्ञ एस. बी. माने-पाटील मार्गदर्शन करतील. कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल, शेती अधिकारी सुधीर पाटील उपस्थित राहणार आहेत. 
सद्या उस लागवडीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे शास्त्रोक्त ऊस लागवड कशी करावी, ऊसाची सरी, ऊस बेणे, पाण्याचे नियोजन लागवडीनंतर पुढील तीन महिन्यातील पिकांचे व्यवस्थापन, तण नियंत्रण तसेच खोडवा पिकांचेही व्यवस्तापन याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे. २८ डिसेंबर दुपारी ४ वाजता (गडहिंग्लज), २९ डिसेंबर सकाळी १० वा. मसनाई मंदिर (नेसरी), ३१  डिसेबर सकाळी १० वा. राम मंदिर (माणगांववाडी), १ जानेवारी सकाळी १० वा. शेती  कार्यालय (पाटणे फाटा), २ जानेवारी सकाळी १० वा. सेवा संस्था हॉल (राजगोळी खु.) व दुपारी २ वाजता शेती कार्यालय (कुदनूर), ४ जानेवारी सकाळी १०वा. शेती कार्यालय (ढोलगरवाडी), ५ जानेवारी सकाळी १० वा. शेती कार्यालय (कोवाड) व ६ जानेवारी सकाळी १० वा. रवळनाथ मंदिर (अडकूर) या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment