कालकुंद्री / प्रतिनिधी
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील विद्यालयात महात्मा
फुले स्मृतिदिनानिमित्य पार पडलेल्या वकृत्व स्पर्धेत खुल्या गटात लोकनेते तुकाराम
पवार ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु. सरिता देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला.
तिला रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. चंदगड आजरा तालूक्यातील स्पधेत
ही तिने यश मिळविले आहे. तर माध्यमिक गटात हस्ताक्षर स्पर्धत कु. मोहन गुरूनाथ
कांबळे याने प्रथम क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांच्या हस्ते
त्याला प्रशस्तीपत्र, चषक व पुस्तक भेट देण्यात आले. प्राचार्य
सी. बी. निर्मळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. डी. एम. तेऊरवाडकर, प्रा.
विनायक कांबळे, प्रा. रवी पाटील, प्रा.
अनिल गुरव, ई. एल. पाटील, एस.
एल. बेळगांवकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक
होत आहे.


No comments:
Post a Comment