करंजगाव येथे हत्तीकडून भातपिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

करंजगाव येथे हत्तीकडून भातपिकांचे नुकसान



चंदगड / प्रतिनिधी 
करंजगाव (ता. चंदगड) येथे हत्तींकडून शेतकऱ्यांच्या ऊस, मका, भात, नाचना, गवत गंजीचे गेले तीन दिवस नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग भितीच्या छायेखाली आहे. सद्या सुगीचा हंगाम सुरु असल्यामुळे शेतकरी सुगीच्या आटोपण्यात गुंतला आहे. त्यातच हत्तींकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ओमाणा गुंडु गावडे यांची 10 पोत्याची भाताची गंजी, जकोबा गुंडी गावडे यांची 11 पोत्याची भाताची गंजी, शंकर पडते मक्याचे प्लाट, उत्तम दळवी यांचे पाच पोत्याची भाताची गंजी, शरद गावडे यांची 13 पोत्याची भाताची वळी, नामदेव सावंत यांचे ऊसाचे प्लॅट, ओमाणा गावडे यांच्या ऊसाचे प्लाट, बाबु ठाणू गावडे यांची शेतातील केळीची बाग या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान हत्तींनी केले आहे. सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्यामुळे हत्ती नाय घातलेला धुमाकूळ पाहून कोणीही शेताकडे जाण्यासाठी घाबरत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीकडून नुकसानीचे सत्र असेच सुरु राहिले तर जीविताच्या भितीने शेतकरी शेती करण्याचे सोडून देईल. त्यामुळे वनविभागाने या हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



No comments:

Post a Comment