तेऊरवाडी येथील मोडलेला विद्युत खांब तात्काळ बदलला, चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची दखल - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

तेऊरवाडी येथील मोडलेला विद्युत खांब तात्काळ बदलला, चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची दखल



कोवाड / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे गावच्या मध्यभागी पाण्याचा टाकीसमोर असणारा विद्युत खांब मोडल्याने गावातील विज पुरवठा बंद पडला होता. यांसदर्भातील वृत्त चंदगड लाईव्ह न्यूजने काल प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत महावितरण कंपनीने आज दिवसभर ग्रामस्थांच्या सहकार्याने नवीन खांब उभारून विजपुरवठा सुरळीत केला. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण विज पुरवठा खंडीत झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. याकामी महावितरणचे कर्मचारी वीजतंत्री राम शिरढोणे व  नवनाथ पवार यांना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील मोडलेला विद्युत खांब बदलताना महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ.




No comments:

Post a Comment