![]() |
| कालकुंद्री (ता. चंदगड) येथे `एकदम झकास` या मराठी चित्रपटाच्या पोस्टर उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, चंद्रशेखर तारळी व चित्रपटातील कलाकार. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे श्री देव
कल्मेश्वर मंदिरामध्ये `एकदम झकास` या मराठी चित्रपटाचे सर्व कलाकारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे
तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. पाटील
म्हणाले, ``मुथूराज
रेड्डी हे आंध्रप्रदेशातील आहेत. ते मराठी भाषिक नसून देखील त्यांनी चित्रपटामध्ये
मराठी व कन्नड या भाषेचा त्यांनी वापर केला. त्यांच्या मनातील तळमळीमुळे त्यांनी
आपल्या जन्माचे ठिकाण सोडून महाराष्ट्र, कर्नाटक सिमेवरील दड्डी, राजगोळी खुर्द या
गावाच्या ठिकाणी वास्तव्य केले आहे. मनातील दिग्दर्शन कागदावर उमटवून त्यांनी
तळमळीचे नायक, नायिका व इतर पात्रांची स्थानिक लोकांची निवड करुन घेतली. वर्षभरात प्रदर्शित
होणाऱ्या `एकदम
झकास` या मराठी व कन्नड या दुभाषिक
चित्रपटाची निर्मिती करुन स्वता: ही मराठी बोलण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. शिवाजीराव
कोकीतकर हे प्रथम अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाने अश्रुंची झाली फुले (लाल्या), वाहतो
ही दुर्वाची जुडी (सुभाष), वादळ (मिलिंद), उध्याचा
संसार (उल्हास), वेगळं व्हायचंय मला (सुरेश आगरकर) अशा नाटकात
भूमिका केल्या आहेत.``
कार्यक्रमावेळी चित्रपटातील कलाकार शिवाजीराव कोकीतकर, रामा लोहार, रणजीत सिंह ,कलामुदिन शहा, बसवराज,हर्षा पतगर, ऋतुजा कुरबेट्टी, ऐश्वर्या खातेदार, रमेश पवार,पद्मजा शहा,झुबेर मुल्ला, कामाक्षी , अनिल होसमणी, रविराज रारवी,किर्ती अभी, पूजा पवार उपस्थित होते. तंटामुक्त समिती अध्यक्ष भागोजी पाटील, नरसू तेऊरवाडकर, मधुकर कोकीतकर, विजय कोकीतकर, कलाप्पा जोशी, आनंद पाटील,कलाप्पा तेऊरवाडकर, ईश्वर वरपे, जयराम पाटील, लिंगायत धर्म महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर तारळी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनीं अबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विनायक कांबळे व आभार क. जो. पाटील यांनी मानले.

1 comment:
Vary nice
Post a Comment