![]() |
नांदवडे (ता चंदगड) येथे गोवर रुबेला बाबत मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. पाटील, सरपंच सौ. मळविकर व इतर. |
कार्वे / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) श्री
भावेश्वरी विद्यालय व केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडे येथे गोवर रुबेला लसीकण
मोहिम संपन्न झाली. सरपंच सौ. संज्योती मळवीकर यांच्या हस्ते गोवर रूबेला लसीकरण
मोहिमेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. आय. पाटील होते.
प्रास्ताविक व स्वागत
केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी यांनी करून लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट
केले. उद्घाटक सौ. मळवीकर यांनी ``शासनाच्या एम. आर. लसीकरण मोहिमचे स्वागत करून लसीकरण प्रसंगी पाल्यांना घेऊन आलेल्या
शेकडो पालकांचे अभिनंदन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आर. आय. पाटील यांनी गोवर व रुबेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी
या राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा व बाह्य संपर्क सत्राच्या माध्यमातून ९ महिने
ते १५ वर्षे वयोगटातील मुलामुलीनी एम. आर. ची लस टोचून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
शाळाबाह्य मुले व ऊसतोड मजूरांची मुले यांनी या
मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. आभार व्ही. एन. कांबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment