चंदगड नगरपंचायतीबाबतचे पालकमंत्र्याचे पत्र नगरविकास विभागाच्या सचिवांना सादर - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2018

चंदगड नगरपंचायतीबाबतचे पालकमंत्र्याचे पत्र नगरविकास विभागाच्या सचिवांना सादर

चंदगड नगरपंचायतीबाबत पालकमंत्र्यांनी दिलेले पत्र नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांना देताना. भाजपा नेते रमेशराव रेडेकर, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, उद्योजक सुनिल काणेकर, चंद्रकांत दाणी, ॲड. विजय कडूकर आदी.

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायत किंवा नगरपरिषदेचा दर्जा द्यावा. अशा प्रकारे मागणीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. हे पत्र भाजपचे कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, स्थानिक नेते रमेशराव रेडेकर यांच्यासह  उद्योजक सुनिल काणेकर, चंद्रकांत दाणी, ॲड. विजय कडूकर आदींच्या उपस्थितीत नगरविकास विभागाचे मुख्य सचिवांना दिले आहे.  या पत्रात नामदार श्री. पाटील यांनी चंदगड हे तालुक्यातील ठिकाण असुन या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. चंदगडचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायतीला सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. चंदगडाचा वाढता विस्तार लक्षात घेता या ठिकाणी नगरपंचायत कींवा नगरपरिषद दर्जा देण्यात यावा असे विनंती पत्र दिले आहे. 


No comments:

Post a Comment