![]() |
चंदगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन कार्यक्रमावेळी उपस्थित समाजबांधव. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील
सर्व फुले, शिव-शाहु व आंबेडकर चळवळीतील संघटना, कार्यकर्त्यांच्या वतीने चंदगड
तालुका समाज सुधारणा मंडळ या ठिकाणी घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीकांत कांबळे
यांनी आपल्या अमोघ वत्कृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. आंबेडकर यांनी देशातील दिन,
दलित, श्रमिक, विस्थापितांच्या, शोषितांच्या अडचणीवर मात करुन प्राण पणाला लावून समता,
न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या चतुसुत्रीची मंगलवाट दाखविल्याचे सांगितले. यावेळी
दिपक माळी, पंडित कांबळे, गणपती कांबळे, प्रल्हाद कांबळे, नियाज मदार, सुरेश
कांबळे, तुकाराम कांबळे, सुधाकर कांबळे, दयानंद कांबले उपस्थित होते. पंडित कांबळे
यांनी आभार मानले.
नांदवडे (ता. चंदगड)
येथील श्री भावेश्वरी विद्यालयाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न
झाला. प्रास्ताविक पी.एम. कांबळे यांनी केले. आर. आय. पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या
कार्याचा आढावा घेऊन बाबासाहेब म्हणजे दुःखाच्या मुलखातील प्रकाश यात्री असल्याचे
सांगितले. याप्रसंगी डी. एस. गावडे, प्रा. मेघा
सुतार, टी. आर. कांबळे उपस्थित हाते. आभार सौ. एस. आर. कोरवी यांनी
केले.
No comments:
Post a Comment