मलगेवाडी येथे पाणंद रस्त्यांचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

मलगेवाडी येथे पाणंद रस्त्यांचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते शुभारंभ

मलगेवाडी (ता. चंदगड) येथे पाणंद रस्त्याचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार शिवाजी शिंदे, सभापती श्री. देसाई, सरपंच यशोदा कांबळे व ग्रामस्थ. 
चंदगड / प्रतिनिधी
मलगेवाड़ी (ता. चंदगड) येथील पाणंद रस्त्याचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते झाले. सुभेदार यांनी या कामाचे  भरभरून कौतुक केले. मलगेवाड़ी हे 500 लोकसंख्या असलेले गावांमधे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे लोकांमधे उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रसंगी लाभार्थ्यांना जीर्ण रेशन कार्ड बदल नवीन कार्ड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. अपंग व्यक्तिना शासकीय सुविधापर कार्ड देण्यात आले. शेती उपयोगी साहित्याचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सौ. विजया पांगारकर, तहसीलदार शिवाजी शिंदे, मंडल अधिकारी सौ. राजश्री पचंडी, तलाठी श्री. काटकर, दौलत विश्वस्त संस्थेचे चेअरमन अशोकराव जाधव,  सभापती बबन देसाई, सरपंच यशोदा कांबळे, पोलिस पाटील धोडीराम पाटील यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment