चिंचणे, तेऊरवाडी परिसरात गव्याकडून शाळू पीक फस्त - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

चिंचणे, तेऊरवाडी परिसरात गव्याकडून शाळू पीक फस्त



कोवाड / प्रतिनिधी
चिंचणे - तेऊरवाडी (ता. चंदगड) परिसरामध्ये जंगली गव्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. रोज रात्री या गव्यांच्या कळपाकडून शाळू पिक उध्वस्थ केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून रोजच्या या त्रासाला शेतकरी वर्ग त्रासून गेला आहे.
या परिसरात सोयाबीन, भुईमूग, मका पिक काढून झाल्यानंतर शाळु, हरभरा आदि पिकांचे उत्पादन शेतकरी घेतो. पण या पिकावर गव्या कडून डल्ला मारला जात आहे. हजारो रुपये खर्च करून शेती करायची आणि क्षणात ही शेती गव्या कडून फस्त केली जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांसमोर शेती करावी व सोडावी अशा प्रश्न पडला आहे. या परीसराला मोठ्या प्रमाणात डोंगर लाभला आहे. डोंगराच्या दोन्ही बाजूना ताम्रपर्णी व घट प्रभा नदया वाहतात. मध्यभागी डोंगरामध्ये गवा वास्तव्यास आहेत. चिंचणे परिसरात वन विभागाने चर खोदली आहे. पण याचाही फारसा परिणाम गव्यावर जाणवत नाही. गेल्या दोन दिवसात रामू पाटील, मोहन पाटील, भरमू पाटील या शेतकऱ्यांचा शाळू या गव्यानी फस्त केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन विभागाने या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.



No comments:

Post a Comment