कोवाडला सोमवारी मराठा आरक्षण विजयी मेळावा व शहिदांना श्रध्दांजली कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

कोवाडला सोमवारी मराठा आरक्षण विजयी मेळावा व शहिदांना श्रध्दांजली कार्यक्रम


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथे सोमवार दि. 3 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 4 वाजता शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज (ठोक मोर्चा) व मराठा कृती समिती चंदगड यांच्या वतीने मराठा समाजाला मिळालेल्या 16 टक्के प्राथमिक मराठा आरक्षणचा विजयी मेळावा व शहीद बांधवाना श्रद्धांजली अर्पण हा कार्यक्रम होत आहे.
कोपर्डीच्या घटनेनंतर उसळलेला एल्गार आणि सकल मराठा बांधव एकत्र येवून घडलेला ईतिहास बद्दल आदर व्यक्त करणे गरजेचे आहे. लाखोंचे निघालेले मोर्चे ज्याची दखल आख्या जगाने घेतली. याला कारण म्हणजे आपण सर्व मराठा समाज एकत्र येवून या लढयात खांद्याला खांदा लावून लढला. याचा दखल सरकारला घ्यावी लागली. त्यामुळे  ही लढाई जिंकता आली. पण अस हे सहज सोप आरक्षण मिळालेल नाही. या लढयामध्ये आपले 40 मराठी बांधव शहीद झाले. या सर्वांनी हुतात्म पत्करल. या सगळ्या गोष्टीच अभिष्टचिंतन म्हणून सोमवारी कोवाड येथे संध्याकाळी 4 वाजता सकल मराठी बांधवानी शिवाजी महाराज चौकात उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment