![]() |
इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे प्राथमिक शाळेतील मुलांना शिवशाही कब्बडी क्लबच्या वतीने क्रिडा ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित क्लबचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शिक्षक. |
चंदगड / प्रतिनिधी
इब्राहिमपूर (ता.
चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना `शिवशाही कबड्डी क्लब इब्राहिमपूर’ यांचे वतीने 60 विद्यार्थ्यांना शालेय क्रिडा
ड्रेसचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विनायक जनकाप्पा शिवनगेकर हे होते.
कार्यक्रमाच्या
सुरुवातीला प्रतिमापूजन झाले. प्रास्ताविक गजानन बेनवाड यांनी केले. शिवशाही कबड्डी क्लब इब्राहिमपूरचे प्रमुख नंदकुमार
तुकाराम गुरव यांचा सत्कार शाल व श्रीफळ देवून विनायक शिवनगेकर यांनी तर कृष्णा
बाबू मोहिते यांचा सत्कार उत्तम पाटील (मुख्याध्यापक) यांच्या हस्ते झाला. अनुप
शिरोळकर, कु. देहू कस्तुरे, कु. संकेत घोळसे यांचाही यावेळी सत्कार झाला. या प्रसंगी
सौ. रंजना देसाई (उपाध्यक्षा SMC), अजित देसाई (सदस्य SMC) उपस्थित होते. विनायक शिवनगेकर व
शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रेरणेतून शालेय क्रिडा ड्रेस मुलांना गरजेचे असलेने
या देणगीदारांच्या कडून विध्यार्थ्यांना हे कीट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर युवा
संघर्ष चौक इब्राहिमपूर या मंडळामार्फत टेबल ग्लास (काच) व शालेय पोषण
आहारसाठी भांडी शाळेला प्रदान करण्यात आली. यासाठी कोळशिराम साबळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसो
पाटील यांनी केले. आभार संजय कुंभार यांनी मानले.
2 comments:
खूप छान! असेच प्राथमिक शाळेच्या मुलांना प्रोतसहन मिळत जावो, आणि हया कामात सर्वांचा हातभार लागत राहावा
खूप छान! असेच प्राथमिक शाळेच्या मुलांना प्रोतसहन मिळत जावो, आणि हया कामात सर्वांचा हातभार लागत राहावा
Post a Comment