![]() |
अस्वलाचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
उमगाव पैकी माळी (ता. चंदगड) येथे जंगली अस्वलाच्या हल्यात यशवंत
मोतीराम गावडे (वय-55) हे गंभीर जखमी झाले. आज दुपारी साडेचार वाजता हि घटना घडली.
यासंदर्भात माहीती अशी - श्री. गावडे हे आपल्या माळी येथील शेताकडे
काजूच्या बागा स्वच्छ करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नागोजी
गावडे व गोविंद पिळणकर हे देखील काजूची बाग स्वच्छ करत होते. हे तिघेही वेगवेगळ्या
ठिकाणी एकाच शेतात काम करत होते. या ठिकाणी झाडी वाढलेली असल्यामुळे हाकेच्या
अंतरावर असूनही ते एकमेकांना दिसत नव्हते. त्याचवेळी झुडपात लपून बसलेल्या जंगली अस्वलाने
पाठीमागून येऊन यशंवत यांच्यावर हल्ला केला. हल्ला अचानक केल्याने त्यांनी
आरडाओरडा केला. यावेळी सहकारी नागोजी व गोविंद हे पळून यशवंत यांच्या मदतीला धावून
अस्वलाकडून यशवंत यांना सोडवून घेतले. यावेळी अस्वल भिऊन जंगलात पसार झाले. यावेळी
झालेल्या झटापटीत अस्वलाची टोकदार नखे लागल्याने यशवंत यांच्या डोकीला गंभीर
दुखापत झाली. जखमी यशवंत यांना तातडीने चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात प्राथमिक
उपचारासाठी हलवले. येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज
येथे दवाखान्यात हलविण्यात आले आहे. घटनेची माहीती कळताच वनविभागाचे सी. पी.
पावसकर, एच. एस. कालवेल, गुंडू देवळी, बाळु पवार, बुधाजी कांबळे यांनी घटनास्थळी
भेट देवून घटनेची माहीती घेतली.
आमदार कुपेकर यांच्याकडून तातडीच्या मदतीसाठी सुचना
दरम्यान या घटनेची माहीती मिळताच चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या
आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी जिल्हा उपवनरक्षक श्री. धुमाळ व चंदगड रेंजर
दत्तात्रय पाटील यांना तातडीची मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment