![]() |
तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे अष्टविनायक क्रिकेट क्लबच्या वतीने शाळेला क्रिडा साहित्याचे वाटप झाले. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील अष्टविनायक क्रिकेट क्लब मार्फत तडशिनहाळ
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय क्रिडा साहीत्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजु पाटील होते. प्रास्ताविक तानाजी नाईक यांनी
केले. अष्टविनायक क्रिकेट क्लबचे प्रमुख प्रा. पुंडलीक दरेकर, बापु गडकरी, विक्रम करडे, विक्रम पाटील, राजू बोलके, मोहन निवगिरे या सर्वांचे स्वागत करण्यात आले. कै. लक्ष्मण
गडकरी याच्या स्मरणार्थ दरवर्षी विद्यार्थ्यांतून उत्कृष्ठ वाचक स्पर्धची घोषणा
करण्यात आली. कल्लाप्पा निकीरे यांनी वॉटरफिल्टर भेट दिला. यावेळी पुंडलीक बोलके, महादेव काबंळे, नामदेव पाटील, जोतीबा बोलके, दिपक पाटील, ऋषीकेष करडे, विनायक नाकाडी, सुरज काबंळे, दौलत करडे व विद्या मदिंरमधील
सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार गायत्री शिंदे यानी मानले.
No comments:
Post a Comment