![]() |
श्रावण वैजू पाटील |
कोवाड / प्रतिनिधी
मलतवाडी (ता. चंदगड) येथील युवकाचा मोटारसायकल घसरुन झालेल्या
अपघातात मृत्यू झाला. श्रावण वैजू पाटील (वय- ५०) असे मयताचे नांव आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान
मलतवाडी ते सांबरे रस्त्यावरील म्हारकीच्या माळावर अपघात झाला. अपघाताची माहिती
समजताच गावावर शोककळा पसरली. गावठान (ता. गडहिंग्लज) येथील मुलगीला भेटून घरी परतताना
हा अपघात झाला. शनिवारी सायंकाळी मलतवाडी येथे अंत्यसंस्कार झाले.
अधिक माहिती अशी : श्रावण पाटील हा युवक उत्तम ट्रॅक्टर चालक होता.
काही वर्षे त्याने स्वतः ट्रॅक्टर घेऊन व्यवसाय केला. सध्या ते गावातील एका
व्यक्तीच्या उसाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. कारखान्याची बस पाळी
असल्याने ट्रॅक्टर बंद ठेवून शुक्रवारी रात्री आठ वाजता गावठान येथील मुलीला
भेटण्यासाठी मोटारसायकलवरुन गेला होता. साडे नऊ वाजता मुलीच्या घरी जेवन करून गावी
येत असताना सांबरे येथील महारकीच्या माळावर मोटारसायकल घसरून अपघात झाला. जखमी
अवस्थेत श्रावण पाटील रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. रात्री उशिरा
रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरुनी अपघाताची माहिती गावात दिली. त्यावेळी गावकऱ्यानी
तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या श्रावणाला तात्काळ गडहिंग्लज
येथील दवाखान्यात दाखल केले. पण उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अंत्यंत
हालाखीच्या परिस्थितीतून दिवस काढलेल्या श्रावणच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा
पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार
आहे.
No comments:
Post a Comment