कालकुंद्री कागणी रस्त्याच्या दर्जेदार कामामुळे प्रवासी वर्गात समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2018

कालकुंद्री कागणी रस्त्याच्या दर्जेदार कामामुळे प्रवासी वर्गात समाधान

कालकुंद्री ते कागणी रस्त्याचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम व काळ्या मातीत  कॅल्शियम हायड्रेट मिसळून सुरू असलेले रोलिंग

कालकुंद्री /प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कालकुंद्री ते कागणी या दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली कालकुंद्री ते कोवाड -बेळगाव मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता  दुरावस्थेमुळे नेहमी चर्चेत होता .अनेक वेळा रस्ता करूनही काळया मातीमुळे खचत होता हे ओळखून राज्य शासन व बांधकाम विभागाने दोन किमी पैेकी नेहमी खचणाऱ्या 760 मिटर रस्त्यासाठी 51 लाखांचा निधी देऊन मजबुतीकरणाचे काम ठेकेदारामार्फत सुरू केले आहे .वीस फूट रुंदीचा रस्ता एकते सव्वा फूट खोल खोदून पूर्ण रस्ता  मॅन्युअल सब बेस, जी वन ,जी टू ,बीबीएम ,कार्पेट व  सील  कोट अशा सहा थरांमध्ये पूर्ण होणार आहे ,यातील बीबीएम, कार्पेट  व सील कोट या डांबरी रस्त्याची रुंदी साडे बारा फूट राहणार आहे ,सध्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ व प्रवाशांनी वाहतुकीच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल पंधरा दिवसांसाठी सहकार्य करावे असे आवाहन बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांचेमार्फत करण्यात आले आहे .एकंदरीत दर्जेदार रस्ता कामामुळे कालकुंद्री व परिसरातील ग्रामस्थांना पुढील काही वर्षे खड्डेमुक्त रस्ता पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे . यातील उल्लेखनीय भाग म्हणजे ठेकेदार श्रीधर गोंजारे यांनी दीड फूट खोदून सुद्धा काळी माती लागल्याने ती घट्ट करण्यासाठी 70 टक्के कॅल्शियम हायड्रेट अर्थात भाजलेल्या चुन्याची  शेकडो पोती पावडर तळातील काळया मातीत एकजीव करून ती रोलर द्वारे खडका प्रमाणे घट्ट करण्याचा केलेला वेगळा प्रयोग लोकांच्या चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला आहे .




1 comment:

Post a Comment