![]() |
कोवाड : येथील मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांनी अशी गर्दी केली होती. |
कोवाड
/ प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) बेळगांव येथील रोटरी क्लबच्या वतीने
येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणावर मोफत आरोग्य शिबिर झाले. शिबीरात २००
रुग्णांची तपासणी करण्यात आली. दि
किणी कार्यात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन.
व्ही. भोसले यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. शिबिरात कोवाडसह परिसरातील किणी, नागरदळे, तेऊरवाडी, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी आदी गावातील रुग्णांनी
लाभ घेतला. रोटरी क्लबचे सदस्य विरसिंह भोसले, सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई उपस्थित होते. बेळगाव येथील डॉ.
विजयलक्ष्मी कूलगोड, डॉ. शरद श्रेष्ठ, डॉ. विश्वनाथ उपलधनी यांनी शिबिरात
स्त्री रोग, लहान मुलांची आरोग्य तपासणी, त्वचारोग, पाठ दुखी, मान दुखी, सांधेदुखी आदी आजारांची मोफत तपासणी
करून उपचार केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांच्यासह श्रीराम विद्यालयाच्या
शिक्षकांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment