कालकुंद्री
/ प्रतिनिधी
ढोलगरवाडी
(ता. चंदगड) येथील सर्पमित्र बाबुराव टक्केकर विज्ञान नगरीत संपन्न होणाऱ्या
विज्ञान प्रदर्शनाच्या तारखेत तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात आला आहे. 13 ते 15
डिसेंबर रोजी होणारे विज्ञान प्रदर्शन आता 19 ते 21 डिसेंबर या तीन दिवसात भरणार
आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांनी बैठकीत दिली.
प्रदर्शनाच्या
उद्घाटन समारंभ प्रसंगी भाभा अणु संशोधन केंद्राचे जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ
वैज्ञानिक शिवराम भोजे उपस्थित राहणार आहेत. शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड
विद्यालय या 44व्या तालुकास्तरीय विज्ञान
प्रदर्शनाचे यजमानपद भूषवत आहे. या विद्यालयाची सर्पशाळा म्हणून ख्याती असल्याने
प्रदर्शन काळात येथे भेट देणाऱ्या विज्ञान प्रेमीना, विद्यार्थ्यांसाठी सर्प
प्रदर्शन व सापांबद्दलची शास्त्रोक्त माहिती प्रात्यक्षिकासह देण्याचे संस्थेने
जाहीर केले आहे. यामुळे सर्वांना प्रदर्शनाचा दुहेरी आनंद व ज्ञान मिळणार आहे. प्रदर्शनात
विविध गटात विद्यार्थी, शिक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैक्षणिक, वैज्ञानिक व लोकसंख्या विषयक उपकरणे व साहित्य मांडणार आहेत. आमदार
संध्यादेवी कुपेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन व बक्षीस वितरण होईल, अशी
माहिती सुभेदार यांनी दिली. यावेळी केंद्रप्रमुख विलास कांबळे यांचेसह डी. आय.
पाटील, वाय. आर. निटूरकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment