![]() |
स्नेहल पाटील |
चंदगड
/ प्रतिनिधी
नागरदळे
(ता. चंदगड) येथील रहिवाशी स्नेहल विजय पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद
प्रशासन संचालनालया तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत कर निरीक्षक आणि प्रशासकीय
अधिकारी वर्ग दोनच्या पदावर निवड झाली आहे. स्नेहल यांचे माध्यमिक शिक्षण गावातच व
उच्च माध्यमिक शिक्षण व्ही. पी. देसाई कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. चंदगड
महाविद्यालयात बी. एस. स्सी. ही पदी घेतली. त्यांना यापूर्वी एन. एम. एस. हि
शैक्षणिक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी अभ्यास
सुरु केला. दरम्यान नगरपरिषद प्रशासन संचालनालयातर्फे घेतलेल्या परिक्षेत उज्वल यश
संपादन केले. तिला वडील विजय पाटील व आई वर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment