कोवाड महाविद्यालयाचा 22 जानेवारीला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2019

कोवाड महाविद्यालयाचा 22 जानेवारीला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ


कोवाड / प्रतिनिधी
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व सर्वोदय इंग्लिश मेडिअम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम दि. २२ व २३ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी दिली. मंगळवार (ता. २२) रोजी सकाळी ८ वा. शेला पागोटे व प्रश्नमंजूषा, ९ वा. शरीर सौष्ठव स्पर्धा व ११ वा. डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षस्थेखाली पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यावेळी कार्पोरेट सल्लागार रंगा ऊर्फ पी. आर. शिंगटे, मल्लापाण्णा चौगुले उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता सर्वोदय इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन  होणार आहे. गोविंद पाटील अध्यक्ष व शामराव बेनके उपस्थित राहणार आहेत. बुधवार (ता. २३) रोजी सकाळी ८ वाजता फनी गेम्स व रूप संगम फॅशन पार्कचे मालक दयानंद सलाम, दुपारी १२ वा. सचिव एम. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षस्थेथाली विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाजीराव ज्वेलर्सचे मालक हणमंतराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. रुपसंगम फॅशन पार्कचे मालक दयानंद सलाम उपस्थित राहणार असल्याचे डॉ. निळपणकर यांनी सांगितले. यावेळी जिमखाना प्रमुख प्रा. आर. टी. पाटील, डॉ. एस. एन. कांबळे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment